आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ राजकीय विचारवंत रजनी कोठारी यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ज्येष्ठ राजकीय विचारवंत रजनी कोठारी (८६) यांचे सोमवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून किडनी विकाराने आजारी असलेल्या कोठारी यांची सकाळी पावणेदहाच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मिलून आणि आशिष ही दोन मुले आहेत.
व्ही. पी. संग सरकारच्या काळात कोठारी नियोजन आयोगाचे सदस्यही होते. राजकीय विचारवंत म्हणून विशेष ओळख असलेले कोठारी यांनी १९६३ मध्ये 'विकसनशील समाज शिक्षण केंद्र' स्थापन करून समाजशास्त्रे तसेच मानवी मूल्यांवर संशोधनासाठी त्यांनी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नंतर १९८० मध्ये त्यांनी 'लोकायन' ही संस्था स्थापन करून कार्यकर्ते व अभ्यासकांची सांगड घालून दिली होती.

अनेक प्रतिष्ठित संस्थांवर ते सदस्य म्हणून कार्यरत होते. कोठारी यांनी वैचारिक लिखणही केले. 'पॉलिटिक्स इन इंडिया', 'कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स', 'रिथिंकिंग डेमोक्रसी' इत्यादी पुस्तकांतून त्यांनी विविध सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला होता.