आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Politics: Manmohan Varses Arun Jaitely, Sensex Come Down

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण: संसदेत मनमोहन विरुद्ध अरुण जेटली नाट्य, सेन्सेक्सही हादरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आर्थिक संकटासारख्या परिस्थितीवर अखेर पंतप्रधानांनी मौन सोडले. शुक्रवारी संसदेत सरकार व अर्थव्यवस्थेच्या व्यथा-कथा त्यांनी मांडल्या. मनमोहन लोकसभेत आले, भाषण वाचून निघून गेले. यामुळे विरोधक, विशेषत: भाजपने तीव्र नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. राग याचा होता की, त्यांनी फक्त आपलेच म्हणणे मांडले, विरोधकांचे काहीही ऐकून घेतले नाही. राज्यसभेतही बराच गोंधळ झाला. यानंतर भाजप नेत्यांनी राष्‍ट्रपतींची भेट घेऊन लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश सरकार द्यावेत, अशी मागणी केली.


अर्थव्यवस्थेबाबत आपल्या 9 वर्षांच्या कार्यकाळाचा दोष नाकारला. विरोधक व जागतिक स्थिती जबाबदार असल्याचे सांगून मान्सूनवर आशा ठेवल्या. भाषणात ते अर्थतज्ज्ञ कमी नेते अधिक होते. चिदंबरम यांचेच उपाय त्यांनी उगाळले.


संकटाचे कारण जागतिक पंतप्रधान म्हणाले की, अर्थव्यवस्था अगदीच बिकट नाही. अद्याप 1991 च्या आर्थिक संकटासारखी परिस्थिती ओढवलेली नाही. संपूर्ण जगातच परिस्थिती बिकट आहे. बाजारात स्पर्धा वाढली आहे. आपल्यावर त्याचा परिणाम होत आहे.


आम्हाला विरोधी पक्षांचे सहकार्य हवे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यामुळे आता सबसिडी कमी करणे, विमा, पेन्शन सेक्टरमध्ये सुधारणेची नाही तर प्रशासनावर अंकुश, जीएसटी लागू करण्याची गरज असल्याचे सांगून त्यासाठी विरोधकांचे सहकार्य गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.


हे तर त्यांचे नैराश्य भाजप 2004 आणि 2009 चे पराभव पचवू शकला नाही. त्यामुळे ते सतत टीका करत राहतात, असे पंतप्रधान म्हणाले. तुम्ही एखादा असा देश पाहिला आहे का? ज्या ठिकाणी विरोधक पीएम..., पीएम... अशी घोषणाबाजी करतात. (पंतप्रधानांनी ... म्हणजे उच्चारलेला शब्द ‘गली गली मे शोर है...’ यानंतर वापरला जातो. हा शब्द काढण्यास पीठासीन अधिका-यांनी नाकारले, नंतर तो हटवण्यात आला.)


फायली सांभाळणे माझे काम नाहीभ्रष्टाचार वाढत आहे हे खरे. पण सरकार एकाही आरोपीला सोडणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. कोळसा प्रकरणाच्या फायलींचे विचाराल तर त्या सांभाळणे हे माझे काम नाही, असेही त्यांनी सांगून टाकले.


तेव्हा का ऐकले नाही? आता तुम्ही जागतिक कारण सांगत आहात. पण जगातील देश तुमच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याची आणि धोरण ठरवण्याची क्षमता नसल्याचे सांगत होते. भारताची पत घसरत असल्याचे सांगितले होते, हे तुम्ही विसरलात का? विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वासही घोटाळ्यांमुळे आपण गमावला आहे.


आता विरोधक आठवले का? अर्थव्यवस्थेला दरीत ढकलल्यानंतर सरकार राजकीय सहकार्याची भाषा करते. राज्य सरकारे आणि विरोधकांच्या विरोधानंतरही 2009 पासून 2011 पर्यंत सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्यामुळेच ही परिस्थित ओढावली आहे, असे जेटली म्हणाले.


नैराश्यात तुम्ही काय नाही केले? तुम्ही तरी असा
देश पाहिला आहे का, ज्या ठिकाणी विश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठी पंतप्रधान काहीही करतात? (काहीही या शब्दाचा इशारा राव सरकारमध्ये खासदारांना दिलेल्या लाचेसंबंधी होता. जेटलींचा हा शब्दही वगळला.)
फायली गायब का झाल्या? कोळसा घोटाळ्यातील फायली गहाळ झाल्या. यातून सरकार पळ काढू शकत नाही. जेटली म्हणाले, न्यायालयानेही फटकारले आहे. असे असताना, फक्त विरोधकच दोषी कसे?


पंतप्रधानांच्या भाषणाचा बाजारावर असा झाला परिणाम
भाषण सुरू झाले तेव्हा
दुपारी 12 वाजता
सेन्सेक्स
219
अंक वधारला
भाषण संपल्यानंतर
दुपारी 12.55 वाजता

235
अंक कोसळला
नंतर सावरून 18620 वर बंद


जीडीपीत घसरण
दुपारी संसदेत आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, जीडीपी स्थिर राहील. म्हणजेच अंदाज होता तेवढाच 5.4 % राहील. सायंकाळी आकडेवारी जाहीर झाली तेव्हा जीडीपी 4.4 % होता.


विदेशी चलन साठा 7 दिवसांत 1 अब्ज डॉलर कमी
०18 ऑगस्टला 278.81 कोटी डॉलर होता
०25 ऑगस्टला 277.72 कोटी डॉलर होता
०शुक्रवारी रुपया 85 पैशांनी सावरून, 65.70 झाला