आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मावतीमागील राजकारण: देशात 7.5 कोटी राजपूत, 500 जागांवर होतो थेट परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमात दिपिका पदुकोनने महाराणी पद्मावतींची भूमिका साकारली आहे. - Divya Marathi
सिनेमात दिपिका पदुकोनने महाराणी पद्मावतींची भूमिका साकारली आहे.

नवी दिल्‍ली- पद्मावती सिनेमावरुन निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. भाजपची सत्‍ता असलेल्‍या 7 राज्‍यांनी या सिनेमाचे प्रदर्शन राज्‍यात होऊ देणार नसल्‍याचे सांगितले आहे. दिवसेंदिवस या संख्‍येत वाढ होत आहे. मात्र या सिनेमाआडून राजकीय पक्ष राजपूत समाजाचे राजकारण करत असल्‍याचे दिसत आहे. देशातील 15 मोठ्या राज्‍यात 450-500 विधानसभा जागांवर राजपूत समाजाचा प्रभाव आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेस हे देशातील दोन्‍ही प्रमुख पक्ष सिनेमाच्‍या विरोधात बोलताना दिसत आहे. काँग्रेसशासित पंजाब सरकारनेही सिनेमाच्‍या प्रदर्शनाला विरोध केला आहे. केवळ पश्चिम बंगाल आणि कनार्टक हे राज्‍य सिनेमाच्‍या समर्थनार्थ समोर आले आहेत.


यामुळे या 4 राज्‍यांनी प्रदर्शनाला केला विरोध
1) गुजरात निवडणूक
- गुजरातमध्‍ये 17 ते 18 जिल्‍ह्यात जवळपास 10% मतदार राजपूत आहेत. 20 ते 25 जागांवर याचा थेट प्रभाव पडतो. राज्‍यात सध्‍या 18 राजपूत आमदार आहे.


2) उत्‍तर प्रदेश पालिका निवडणूक
- 10 ते 11% मतदार राजपूत. सध्‍या राज्‍यात पालिका निवडणुका सुरु आहेत. राज्‍यात 14 खासदार आणि 78 आमदार राजपूत आहेत.


3) राजस्‍थानमध्‍ये पुढील वर्षी निवडणूक
- राजस्‍थानमध्‍ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुक होणार आहे. राज्‍यात 8-10% मतदार राजपूत आहेत. जवळपास 28 आमदार आणि 3 खासदार राजपूत आहेत.


4) मध्‍यप्रदेशमध्‍ये पुढील वर्षी निवडणूक
- 7 ते 8% मतदार राजपूत. याचा थेट प्रभाव 40-45 जागांवर होतो. 2018मध्‍ये विधानसभेची निवडणूक आहे. 3 खासदार राजपूत आहेत.


उत्‍तरप्रदेशमध्‍ये सर्वाधिक 1.5 कोटी राजपूत लोकसंख्‍या, 100 जागांवर  परिणाम
- देशात राजपूत समाजाची लोकसंख्‍या जवळपास 7.5 कोटी आहे. म्‍हणजेच ऐकूण लोकसंख्‍येपैकी 5%.
- देशातील 29 राज्‍यांपैकी 15 राज्‍यात राजपूत आमदार आणि खासदार आहेत.

 

राज्‍य राजपूत
उत्तर प्रदेश 1.5 कोटी
राजस्थान 65-70 लाख
मध्यप्रदेश 60-65 लाख
बिहार 50-55 लाख
गुजरात 40-45 लाख
उत्तराखंड 35-40 लाख
हिमाचल 25 लाख


हे आहेत राजपूत समाजातून आलेले नेते, कोणी मुख्‍यमंत्री तर कोणी मिनिस्‍टर
- मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ, रमन सिंह, विरभ्रद सिंह, वसुंधरा राजे, त्रिवेंद्र सिंह रावत हे राजपूत समाजातून आलेले नेते आहेत. दिल्‍लीचे उपमुख्‍यमंत्री मनिष सिसोदिया आणि जम्‍मू-काश्‍मीरचे निर्मल सिंहही राजपूत आहेत.
- आतापर्यंत चंद्रशेखर सिंह आणि विश्‍वना‍थ प्रताप सिंह हे 2 राजपूत पंतप्रधान देशाला लाभलेले आहेत. माजी राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि माजी उपराष्‍ट्रपती भैरव सिंह शेखावत हे देखील राजपूत आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, नेमका काय आहे विवाद?

 

बातम्या आणखी आहेत...