आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्‍न का नाही?, भाजपचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सचिन तेंडुलकरला भारतरत्‍न देण्‍याच्‍या सरकारच्‍या निर्णयावर राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्‍न का देण्‍यात आली नाही, असा सवाल केला आहे. भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरले. 'मी मागणी करीत नसून, सरकारला प्रश्‍न विचारत आहे. मी सचिन तेंडुलकरचा सन्‍मान करतो. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्‍न पुरस्‍कार का दिला नाही ?'

उल्‍लेखनीय म्‍हणजे, बेंगळुरूतील जाहीर सभेत गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींनी सचिनला भारतरत्‍न पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल त्‍याचे अभिनंदन केले होते. तसेच शनिवारी भारतरत्‍न पुरस्‍काराची घोषणा झाल्‍यानंतर राज्‍यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनीही त्‍यांच्‍या फेसबुकवरील अधिकृत पेजवरून या निर्णयाचे स्‍वागत केले होते.