आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - निवडणुकीआधी होणार्या विविध जनमत चाचण्यांत होणार्या गैरप्रकारांबद्दल कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिले आहेत. जनमत चाचण्या घेणार्या देशातील 11 नामांकित संस्थांनी निष्कर्षांत बनवाबनवी केल्याचा गौप्यस्फोट टीव्ही चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आला होता. याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारही नोंदवली होती.
आयोगाने कॉर्पोरेट मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. पैसे घेऊन आकड्यांतील हेराफेरी करत दिशाभूल करणारे अंदाज प्रकाशित करण्याच्या कारस्थानाशी हे प्रकरण निगडित असल्याचे त्यात म्हटले आहे. आयोगाचे मुख्य सचिव अजयकुमार यांनी दोन्ही मंत्रालयाच्या सचिवांना कळवले की या तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. चाचण्यांच्या निष्कर्षात बदल करण्यासाठी काही संस्था राजी झाल्याचे काँग्रेसने दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या प्रकरणात दखल देऊन संबंधित संस्थांवर गुन्हा दाखल करण्याची व जनमत चाचण्यांवर बंदी आणण्याची मागणी काँग्रेसने केलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.