आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Polls Survey News In Marathi,Arvind Kejriwal, AAP, Divya Marathi

जनमत चाचण्यांवर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व हवे, केजरीवाल यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जनमत चाचण्यांवरील विश्वासार्हता कायम राखण्यासाठी त्या घेणा-या संस्था व प्रसारमाध्यमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याची मागणी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्याकडे केली आहे.


जनमत चाचण्या प्रसिद्ध करणा-या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवरील उत्तरदायित्व निश्चित करावे. यामुळे चाचण्यांत अनुकूल बदल करणा-यांवर आळा बसेल, असे केजरीवाल यांनी संपत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘आॅपरेशन प्रायमिनिस्टर’ शीर्षकाच्या या कार्यक्रमात जनमत चाचणी अहवालात फेरफार करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. स्टिंग आॅपरेशन खरे असेल तर देशाच्या लोकशाहीवर विपरीत परिणाम करणारे ठरेल. असत्य गोष्टीवर आधारित जनमत चाचणी घातक आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. आम्ही जनमत चाचण्यांवर संपूर्ण बंदी लादण्याच्या बाजूने नाही. मात्र, या चाचण्या प्रसिद्ध करण्यासाठी ठराविक निकष असावेत हे आमचे म्हणणे आहे. मुक्त आणि निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी अधिनियमामधील बदलास अनुकूल आहे


‘आप’लेच झाले परके
केजरीवाल यांनी न्यूज ब्रॉडकास्टिंग अ‍ॅथॉरिटीच्या (एनबीएसए) चेअरमनला लिहिलेल्या पत्रात ‘आॅपरेशन प्रायमिनिस्टर’ कार्यक्रमातून केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा संदर्भ देत चुकीचे वृत्त प्रसारित करणा-या वृत्त वाहिन्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च् न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) त्याची चौकशी केली जावी.