आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pollution In India Higher Than China: Greenpeace

भारतातील प्रदूषण चीनपेक्षा जास्त, ग्रीन पीस इंडियाचा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - २०१५ मध्ये भारतात चीनपेक्षा जास्त हवेच्या प्रदूषणात नोंद झाल्याचा दावा ग्रीन पीस संघटनेने केला आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषणाचे प्रमाण २१ व्या शतकात पहिल्यांदाच नोंदले गेले आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या उपग्रह छायाचित्रांवरून ग्रीन पीसने हा अहवाल मांडला आहे.

या शतकात पहिल्यांदाच भारतीय नागरिकांना चिनी नागरिकांच्या तुलनेत हवेतील प्रदूषित कणांचा जास्त संपर्क आला. प्रदूषण नियंत्रणासाठी चीनमध्ये राबविलेल्या मोठ्या उपाययोजनांमुळे तेथील हवेतील प्रदूषण कमी झाले. मात्र, भारतामध्ये दशकभरापासून हवेच्या प्रदूषणात विक्रमी नोंद झाल्याचे ग्रीन पीस इंडियाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. हवेतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, गरज पडल्यास रेड अलर्ट जारी करण्याचे उपाय योजले पाहिजेत, असे ग्रीन पीसचे निरीक्षण आहे.

सर्वाधिक २० प्रदूषित शहरांत भारतातील १३ शहरे
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये भारतातील १३ शहरांचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांत विशेषत: उत्तर भारतातील शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. ग्रीन पीसच्या नॅशनल एअर क्वालिटी इन्डेक्स(एनएक्यूआय) अहवालात १७ पैकी १५ शहरांतील प्रदूषण भारतीय मानकांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ३२ पैकी २३ स्थानकांमध्ये प्रदूषणाचा स्तर राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त अाहे.