आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pollution Increased During Test Of Odd Evan Formula In Delhi

#OddEven : घटण्याऐवजी प्रदूषणात वाढच, ट्रायल संपताच रस्त्यांवर Traffic Jam

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑड-ईव्हनच्या 15 दिनवसांच्या ट्रायलदरम्यान दिल्लीच्या नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका झाली. पण प्रदूषण कमी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमानंतर उलट प्रदूषण वाढल्याचे पाहायला मिळाले. आकडेवारीनुसार यादरम्यान दिल्लीच्या हवेचा दर्जा अथ्यंत खराब होता. तसेच ट्रायल संपताच सोमवारी दिल्लीच्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडीही पाहायला मिळाली.

प्रदूषणात झालेली वाढ आणि सर्वेक्षण
- वेब पोर्टल इंडिया स्पेंडच्या सर्व्हेनुसार ऑड-ईव्हनच्या 15 दिवसांच्या ट्रायलदरम्यान राजधानीमध्ये प्रदूषणाची पातळी डिसेंबरच्या अखेरच्या 15 दिवसांच्या तुलनेत 15% टक्क्यांनी वाढली.
- ऑड-ईव्हन ट्रायल दरम्यान PM2.5 चे अॅव्हरेज कंसंट्रेशन 309 होते. पण ट्रायलच्या पूर्वीच्या 15 दिवसांत हे प्रमाण 270 होते.
- PM2.5 प्रदूषणाचे असे पार्टीकल्स आहेत ज्यांचे डायमीटर 2.5 माइक्रोमीटर किंवा त्यापेक्षाही कमी असते. WHO च्या मते हवेत त्यांचे प्रमाण 60 पेक्षाही कमी असायला हवे.
- हे पार्टिकल्स फुफ्फुस आमि ब्लड स्ट्रीमला नुकसान पोहोचवतात.

ट्रायल संपताच दिल्ली जाम
- ऑड-ईव्हन ट्रायलनंतर पहिल्याच सोमवारी विविध ठिकाणी ट्राफिक जाम झाल्याचे पाहायला मिळाले.
- 26 जानेवारीच्या परेडची रिहर्सल हेही यामागचे एक कारण आहे. राजपथावर विजय चौकापासून इंडिया गेटपर्यंत त्यामुळे वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत.
- बीआरटी कॉरीडोर, मथुरा रोडवर मोठ्याप्रमाणत जाम असल्याचे पाहायला मिळाले.

साप्ताहिक सर्व्हेमध्ये दिलासा
- सर्व्हेनुसार जानेवारीतील पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यामध्ये PM2.5 ची पातळी 37% कमी झाली आहे.
- मात्र त्यामागे वेगाने वाहिलेले वारे आणि आर्द्रता हेही त्यामागचे कारण समजले जात आहे.
- एक्सपर्ट्सनुसार या दोन्ही बाबींमध्ये प्रदूषण कमी करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान असते.
- पोर्टलनुसार डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्याच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये PM2.5 ची पातळी 50% वाढली होती.
- जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रमाण घटल्यानंतरही डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या तुलनेत PM2.5ची पातळी अधिक होती.

...तंदूरवरही बॅन आणणार का दिल्ली सरकार..
- आयआयटी कानपूरच्या एका सर्व्हेनुसार दिल्लीतील हॉटेल आणि रेस्तरॉमध्ये कोळशावर चालणाऱ्या तंदूरमुळे होणारे प्रदूषण हेही एक मोठे कारण आहे.
- दिल्लीमध्ये एकूण 36000 हॉटेल आणि रेस्तरॉ आहेत. त्यापैकी 9000 पेक्षा अधिक कोळशाचे तंदूर वापरतात.
- दररोज 37,171 kg PM10 दिल्लीच्या हवेत प्रदूषण वाढवते. त्यात 3,493 किलो कोळशाच्या राखेमुळे होते.
- त्याचप्रकारे दररोज 18369 किलो PM2.5 मध्ये 1758 किलो कोळशा आणि राखेपासून होते.
- दिल्ली सरकारने 2012 मध्ये कानपूर आयआयटीला हा सर्व्हे करण्यास सांगितले होते.
- आयआयटी कानपूरने दिल्ली सरकारला शिफारस केली आहे की, 10 पेक्षा अधिक क्षमता असलेल्या हॉटेल आणि रेस्तरॉंना इलेक्ट्रॉनिक गॅस बेस उपकरणे वापरण्यास सांगावे.
- सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंट (CSE) नेही रिपोर्टला सपोर्ट केला आहे.