आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poor Rich Diparity Widened In India, Divya Marathi

भारतात गरीब-श्रीमंतांतील दरी रुंदावली, यूएनईएससीएपीचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आशिया प्रशांत क्षेत्रात गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी आणखी रुंदावत आहे. भारत, चीन व इंडोनेशियासारख्या अर्थव्यवस्थांमध्ये उत्पन्नातील विषमतेत वाढ नोंदवण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिक या अहवालात याबाबत माहिती आहे. विषमतेमुळे या क्षेत्रातील सामाजिक-आर्थिक बदलांचा मार्ग रोखला जात आहे. उत्पन्नातील असमानता मोजण्यासाठी "गिनी कोएफिशिएंट' हे एकक
वापरले जाते.

* 49,000 अतिअतिश्रीमंतांकडे ७.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती
*40 आशिया-प्रशांत देशांत यूएन-ईएससी एपीचा सर्व्हे
* 20% गरिबांचा राष्ट्र उत्पन्नामध्ये १०% पेक्षाही कमी वाटा

* कारणे : कमकुवत कामगार संघटना, अपुरी सामाजिक संरक्षण यंत्रणा, निकृष्ट प्रतीचे शिक्षण, भांडवल आणि जमिनीची टंचाई तसेच मोजक्यांच्या मुठीत एकवटलेल्या संपत्तीचे अत्याधिक प्रमाण या कारणांमुळे उत्पन्नातील दरी वाढली आहे.

* अशी विषमता
>भारतात १९९० ते २००० या काळात उत्पन्नातील असमानता ३०.८ टक्क्यांवरून ३३.९ टक्क्यांवर पोहोचली.
>चीनमध्ये हे प्रमाण ३०.१ वरून ४२.१वर गेले. इंडोनेशियात ते २९.२वरून ३८.१वर पोहोचले.
>याच काळात कंबोडिया, किरगिझस्तान, मलेशिया, नेपाळ, फिलिपाइन्स, उझबेकिस्तान व थायलंडमध्ये असमानता घटली.