आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Portability Apply To Gas Cylinder Like Mobile, Petrolium Minister Virappa Moiley Declared

गॅसला आता मोबाइलप्रमाणे पोर्टेबिलिटी लागू, पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वयंपाकाच्या गॅसला (एलपीजी) आता मोबाइलप्रमाणे पोर्टेबिलिटी लागू झाल्याचे केंद्रीय तेलमंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी जाहीर केले. देशातील 480 जिल्ह्यांत ग्राहकांना आता गॅस कंपनी बदलता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मोबाइल कंपन्यांप्रमाणे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची पोर्टेबिलिटी सुविधा सुरू करण्यात आली असून ज्या शहरात एकापेक्षा जास्त गॅस वितरक आहेत तेथील ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशातील 13 राज्यांतील निवडक 24 जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर गॅस पोर्टेबिलिटी लागू केली होती. आता ही सुविधा 480 जिल्ह्यांत मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर स्थानिक स्तरावरील वितरकाची निवड ऑनलाइन करायची असून ग्राहकांच्या सोयीसाठी वितरकांना रेटिंग देण्यात आले आहे.
ज्या वितरकांची कामगिरी चांगली आहे अशा वितरकांना चांगले रेटिंग असून त्यानुसार ग्राहकांना पर्याय निवडण्यास मदत होणार आहे. ऑनलाइन नोंदणीनंतर ग्राहकांनी संबंधित वितरकाशी संपर्क साधून पोर्टेबिलिटीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे.