आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षितता निधीसाठी रेल्वेची भाडेवाढ होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेच्या प्रवाशांना आगामी काळात भाडेवाढीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाने विशेष सुरक्षा निधीचा प्रस्ताव रद्द ठरवल्याने रेल्वे आता भाड्यावर अतिरिक्त सेस लावून निधी जमा करण्याचा विचार करत आहे. या फंडामुळे संपूर्ण व्यवस्था सुधारणे आणि अपघात कमी करण्याची व्यवस्था होईल.

अर्थमंत्री अरुण जेटली यांना लिहिलेल्या पत्रात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय रेल्वे सेफ्टी फंडासाठी १ लाख १९ हजार १८३ कोटी रुपयांची मागणी केली होती. अर्थ मंत्रालयाने हा प्रस्ताव रद्द केला. त्यांनी प्रस्तावित रकमेपैकी २५ टक्के रक्कम देण्याबाबत सहमती व्यक्त केली आणि इतर निधी रेल्वे मंत्रालयानेच जमा करावा, असा सल्ला दिला. त्यानंतर रेल्वे भाड्यावर अतिरिक्त सेेफ्टी सेस लावण्याबाबत विचार सुरू आहे.

रेल्वेमंत्री भाडेवाढ करण्याच्या बाजूने नाहीत; पण अर्थ मंत्रालयाच्या नकारानंतर त्यांच्यापुढे दुसरा पर्यायही नाही. स्लीपर, सेकंड क्लास आणि एसी ३ वर सेफ्टी सेस लागेल, तर एसी २ आणि १ वर हा नाममात्र असेल. कारण त्यांचे भाडे आधीच जास्त आहे.
बातम्या आणखी आहेत...