आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफवरील व्याज कमी करण्याची तयारी, आज सादर होऊ शकतो प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (इपीएफओ) पीएफच्या व्याज दरात अंशतः कपात करण्याचा विचार केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये 5 कोटी लाभधारकांना (ज्यांच्या वेतनातून पीएफ कपात होते) त्यांच्या पीएफवर 8.7 टक्के व्याज देण्याचा विचार करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे व्याज कमी आहे. गेल्या वर्षी इपीएफओने पीएफवर 8.75 टक्के व्याज दिले होते. विशेष म्हणजे इपीएफओचे मत आहे, की या वर्षी पीएफवर 8.8 टक्के व्याज देता येऊ शकते. मात्र, संघटनेने गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी व्याज देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आज यासंदर्भात इपीएफओची बैठक आहे.
इपीएफओच्या आकलनानुसार, चालू आर्थिक वर्षात व्याजाद्वारे होणारी कमाई 29,000 हजार कोटींपेक्षा थोडी कमी होईल. त्यामुळे 8.8 टक्के व्याज देणे संघटनेला शक्य होणार नाही. मात्र, पीएफ धारकांच्या अधिक व्याजाची आशा मावळलेली नाही. कारण इपीएफओने तयार केलेल्या प्रस्तावावर संघटनेचे संचालक मंडळ समाधानी नाही. संचालक मंडळामधील केंद्र सरकारच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे, की जर इपीएफओचे आकलन योग्य असेल तर, व्याज 8.8 पेक्षा जास्त दिले पाहिजे. पीएफवरील व्याज निश्चित करण्याचा निर्णय जानेवारी-मार्च या तिमाहीपर्यंत टाळला जाण्याची शक्यता आहे.