आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीठ, फळांसह भाजीपाल्यात शिशाचे प्रमाण ठरवले जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मॅगी प्रकरणानंतर एफएसएसएआय हे अन्न सुरक्षा नियामक आता मीठ, फळे, ज्यूस, भाजीपाला, दाळी, व मांसामधील शिशाचे प्रमाणही निश्चित करणार आहे. नियामकाने यासंदर्भात एक मसुदा तयार केला आहे. निर्धारित प्रमाणापेक्षा शिसे व एमएसजीचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे काही दिवसांपूर्वीच नेस्लेच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातली आहे. शिसे आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. नियामकाने मिनरल वॉटर,मीठ, जॅम, मासे आदींनाही या कक्षेत आणले आहे. त्यातील कथील, आर्सेनिक, पारा व कॅडियमचे प्रमाणही निश्चित होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...