Home »National »Delhi» Poster Against Kumar Vishwas At Aam Adami Party Office In Delhi

कुमार विश्वास यांच्या विरोधात लागले AAP कार्यालयात पोस्टर्स, लिहिले- भाजपा का यार है...गद्दार है

दिव्य मराठी वेब टीम | Jun 17, 2017, 14:57 PM IST

  • कुमार विश्वास यांच्याविरोधात लागलेले पोस्टर्स.
नवी दिल्ली- आम आदमी पक्षातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. यावेळी दिल्ली आरटीओजवळ असणाऱ्या आपच्या कार्यालयाच्या बाहेर कुमार विश्वास यांच्याविरोधात पोस्टर्स लागले आहेत. या पोस्टर्समध्ये कुमार विश्वास यांना गद्दार आणि भाजपचे एजंट म्हटले आहे. यापूर्वी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता की कुमार विश्वास हे भाजपमध्ये सामील होऊ शकतात. आमदार अमानतुल्ला खान यांनी विश्वास हे पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विश्वास यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.

काय लिहिले आहे पोस्टरमध्ये

- आम आदमी पक्षाच्या कार्यालयात शनिवारी हे पोस्टर्स लावण्यात आले. त्यात हे सांगितल्याबद्दल पक्षाचे नेते दिलीप पांडेय यांचे आभार मानण्यात आले होते.
- या पोस्टरवर लिहिले आहे की, भाजपा का यार है, कवि नहीं गद्दार है, ऐसे धोखेबाजों को बाहर करो.. बाहर करो.
- हे पोस्टर कोणी प्रकाशित केले आहे याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Next Article

Recommended