आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा यांच्‍या मारेक-यांची खिल्‍ली उडवण्‍यासाठी संता-बंता जोक्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संता-बंता विनोदांवर बंदी घालावी, तसेच शिखावंरील विनोद देणाऱ्या पाच हजार वेबसाइट्सवरही बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका शीख वकील हरविंदर चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, अशा विनोदांमुळे शिखांचा अपमान होतो. जेव्हा एखाद्या समुदायाला किंवा जातीला लक्ष्य केले जाते, तेव्हा खूप गदारोळ होतो, पण शिखांच्या बाबत कोणीही एक शब्दही बोलत नाही. या याचिकेमुळे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूरही आश्चर्यचकित झाले. त्यांनी बाजू मांडण्यासाठी सहा आठवड्यांचा अवधी दिला. आता पुढील सुनावणी 4 जानेवारी 2016 ला होणार आहे.
या प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्‍टर सध्‍या व्‍हायरल झाले आहे. त्‍यामध्‍ये म्‍हटले आहे की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मारेकरी असलेले सतवंतसिंग व बियांतसिंग यांच्‍यावरून संता-बंताचे विनोद केले जातात. सिख समुदाय या दोघांना शहीद मानतो. संता बंताचे विनोद म्‍हणजे या नायकांचा अवमान आहे. शहीद सतवंतसिंग व बियांतसिंग यांची प्रतिमा यामुळे मलिन होत आहे. आधीही असे एक पोस्टर व्‍हायरल झाले होते. त्‍यामध्‍ये म्‍हटले होते की, ‘इंदिरा गांधींची हत्‍या करणारे सतवंतसिंग व बियांतसिंग यांची खिल्‍ली उडवण्‍यासाठी संता-बंता ही प्रतिमा तयार करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे सिख समुदायाचे लोक हसावे आणि त्‍यांच्‍या या दोन नायकांची प्रतिमा खराब व्‍हावी. या पोस्‍टरमध्‍ये अशीही मागणी करण्‍यात आली होती की, ‘सिख संता-बंता जोक्सविरोधात संघटित व्‍हावे आणि या दोन नायकांची खिल्‍ली उडवणा-यांचा विरोध करावा.’
विनोदांबाबत हे पण
संता- बंताच्‍या प्रतिकात्‍मक फोटोंचा वापर करून वेगवेगळ्या कथाही तयार केल्‍या गेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये लोकप्रिय लेखक खुशवंत सिंह यांचेही नाव आहे. त्‍यामध्‍ये असेही म्‍हटले आहे की, या लेखकाने त्‍यांच्‍या पुस्‍तकात संता- भंताचा सर्वात पहिले वापर केला. त्‍यामुळे हे विनोद लवकर लोकप्रिय झाले.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, संता-बंतासाठी सोशल मीडियावरील पोस्‍ट..