आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे मोदींना \'भारताचे शेर\' तर कुठे म्हटले \'फेकूराम\', दिल्लीत रंगले पोस्टर वॉर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विकास रॅलीच्या आधी दिल्लीत पोस्टर वॉर रंगले. एकीकडे भाजपच्या पोस्टरवर मोदींना भारताचा शेर म्हटले गेले तर, दुसरीकडे त्यांना 'फेकू' ठरवले.

आयटीओ, रोहिणीसह दिल्लीच्या इतरही भागात हे पोस्टर झळकत होते. यावर मोदींना फेंकूराम म्हटले गेले आहे. दिल्लीच्या विकासाचे आणि चांगल्या रस्त्यांची आकडेवारी सादर करत पोस्टरवर लिहिले गेले आहे की, "ओह, आता कळाले गुजरात सोडून दिल्लीची वाट का धरली?" रोहिणी येथे सभा मार्गावर अनेक ठिकाणी मोदी विरोधी पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर कोणी लावले याची मात्र कोणालाच माहिती नाही. मोदी विरोधी पत्रकही वाटण्यात आली, त्यावरही कोणाच्याच नावाचा उल्लेख नव्हता.