आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गाशक्ती यांची नोयडात पोस्टीग ही चूक - अखिलेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दुर्गाशक्तीला नागपाल यांना नोयडामध्ये पोस्टिंग देऊन चूक केली, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली. आयएएस दुर्गा यांना त्यांच्या पतीच्या आग्रहामुळे एसडीएम बनवल्याचे यादव यांनी अमेरिकेतील आघाडी दैनिक ‘वॉल स्ट्रीट र्जनल ’दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

सरकार कोणालाही काम करण्याची सूट देऊ शकते. तशीच सूट दुर्गाशक्ती यांनाही देण्यात आली होती. पण त्यांनी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. त्याची सूट कोणालाही दिली जाऊ शकत नसल्याचे यादव या वेळी म्हणाले.

चौकशी समितीची स्थापना : दुर्गाशक्ती निलंबन प्रकरणाची चौकशी तीनसदस्यीय समिती करणार आहे. गौतम बुद्धनगर येथील अवैध उत्खननाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने वन मंत्रालयाचे संचालक डॉ. सरोज समितीचे यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीला शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.