आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Posting Pictures On Facebook, Twitter Un Islamic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावर छायाचित्र पोस्ट करणे गैरइस्लामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साइट्स फेसबुक व ट्विटरवर छायाचित्र पोस्ट करणे गैरइस्लामी आहे, असे दोन प्रतिष्ठित इस्लामी हेल्पलाइन्सने म्हटले आहे. शिया व सुन्नी समुदायासाठी चालवल्या जाणार्‍या लखनऊमधील दोन हेल्पलाइन्सनी दिलेल्या इशार्‍यात, कुणाचे छायाचित्र पाहून तुम्ही मैत्रीची मागणी करू शकत नाही, असे म्हटले आहे. वास्तवातील प्रेमाचा अनुभव घ्या. आभासी जगातील नाते फायद्याचे नसते, असे सुन्नी मुफ्ती अबुल इरफान नैमूल हलीम फिरंगी महली यांनी सांगितले.

तरुणांनी आभासी जगातील नात्यांऐवजी वास्तवातील नाते सांभाळावे, अशी सूचना मुफ्तींनी केली आहे. या महिन्यात करण्यात आलेल्या एक हजार दूरध्वनींपैकी 50 टक्के प्रश्न इंटरनेट वापराबाबत होते.