आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Postponed To Delhi Gang Rape Hearing By Juvenile Justice Board

दिल्ली गँगरेप- अल्पवयीन आरोपीची सुनावणी लांबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील बहुचर्चित‍ सामु‍हीक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आयोपीची सुनावणी ज्यूवेनाईल कोर्टाने पुढे ढकलली आहे. येत्या पाच ऑगस्टला पुढील सुनावणी होईल.

गेल्या वर्षी 16 डिसेंबरला रात्री धावत्या बसमध्ये 23 वर्षीय पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यासह तिच्या मित्राला बेदम मारहाण करून धावत्या बसमधून बाहेर फेकून दिले होते. पीडित तरुणीचा 29 डिसेंबर रोजी सिंगापूर येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आरोपींमध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे. अन्य आरोपींप्रमाणे त्यालाही शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही.

अल्पवयीन आरोपीची सुनावणी पुढे ढकलण्याची वकीलांनी मागणी केली होती. त्यामुळे ही मागणी मान्य करत ज्युवेनाईल कोर्टाने पाच ऑगस्टपर्यंत पुढील सुनावणी लांबवली आहे.