आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Poverty A Mentality, Its Not Connected With Money Rahul Gandhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरिबी ही तर मानसिकता, पैशाशी त्याचा संबंध नाही; राहुल गांधींची नवी गरिबी शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - गरिबी केवळ मानसिकता आहे. खाणे-पिणे, पैसे किंवा भौतिक वस्तूंच्या कमतरतेशी याचा काहीच संबंध नाही. आत्मविश्वास असेल तर गरिबी दूर करता येऊ शकते, असे खळबळजनक विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेत आयोजित चर्चासत्रात सोमवारी राहुल गांधी म्हणाले, केंद्राने गरिबी निर्मूलनासाठी लोकांत आत्मविश्वास निर्माण केला आहे. सरकारने कितीही कल्याणकारी योजना राबवल्या तरी गरिबांना या विळख्यातून बाहेर काढणे शक्य नाही. जोपर्यंत गरिबांत आत्मविश्वास आणि आत्मशक्ती तयार करत नाही तोपर्यंत ते यामधून बाहेर पडणार नाहीत. केवळ खैरात वाटून गरिबी दूर होणार नाही. लोकांची मदत करण्याचा मी प्रयत्न करीन, परंतु जोपर्यंत ते स्वत: यासाठी काही करत नाहीत तोपर्यंत काहीच होणार नाही, असे राहुल म्हणाले. यासाठी त्यांनी अमेठीतील एका महिलेचे उदाहरण दिले.


टीकेची जोरदार झोड :
राहुल यांचे विधान दुर्दैवी असल्याचे उत्तरप्रदेश भाजपचे प्रवक्ता विजय बहादुर यांनी म्हटले आहे. ते अब्जाधीश परिवारातील सदस्य आहेत. गांधी-नेहरु परिवाराने गरिबी दुरूनही बघितली नाही. त्यामुळे त्यांना याविषयी काहीच ज्ञान नाही, असे मत बसपाचे नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी मांडले. शिरोमणी अकाली दल अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे.