आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज संकटावर रोडमॅप सादर करा; \'आप\' सरकारकडून अनिल अंबानींना नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आप सरकारने दिल्लीतील वीज संकट वितरणातील समस्यांसाठी रिलायन्स (एडीएजी) समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना नोटीस बजावली आहे. ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी अंबानी यांना पुढील आठवड्यात उपस्थित राहून राजधानीतील वीज व्यवस्थेत सुधारणांसाठीचा कृती आराखडा (रोडमॅप) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राजधानी दिल्लीतील दोन तृतीयांश भागाचे वीज वितरण बीएसईएसमार्फत होते. ही कंपनी रिलायन्स समूहाची सदस्य कंपनी आहे. गेल्या आठवड्यापासून दिल्लीत पुरेशी वीज उपलब्ध असूनही अनेक भागांत स्थानिक बिघाडामुळे वीज वितरणात अडथळे येऊ लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज कपात करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री जैन यांनी अनिल अंबानी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आधीच्या सरकारसोबत तुमचे मधुर संबंध राहिलेले असतील. त्यामुळे जनतेच्या हिताकडे दुर्लक्षही केले गेले असेल. परंतु आपचे (आम आदमी पार्टी) सरकार जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही.' याबाबत अंबानी समूहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल सरकार आणि वीज कंपन्यांमध्ये दरवाढीवरून वाद सुरू आहे

पुढील स्लाइडवर वाचा, कंपनीची कामगिरी अतिशय खराब

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)