नवी दिल्ली - दहा वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर यूपीए सरकारमधील दिग्गज नेते आणि मंत्री आता राजकारणाव्यतिरिक्त इतर वाटा चोखाळत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आता त्यांचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासाठी देत आहेत. अशीही चर्चा आहे, की ते आता आत्मकथा लिहिण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद त्यांच्या मुळ व्यवसायाकडे (वकिली) वळले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते राहिलेले अभिषेक मनु सिंघवी यांना देखील आता वकीलीसाठी जास्त वेळ देता येत आहे. काँग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात सिंघवीच त्यांचे वकील आहेत. माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते सुशीलकुमार शिंदे परदेशात सुटी घालवून आल्यानंतर स्थानिक राजकारणात सक्रिय झाले आहेत. तर, माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम देखील त्यांच्या राज्यात काम करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, डॉ. सिंग यांच्यासह त्यांच्या कार्यकाळातील मंत्री आता काय करत आहेत..
छायाचित्र - मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री राहिलेले सलमान खुर्शीद यांनी नुकताच तरुण तेजपाल यांना जामीन मिळवून दिला आणि ते सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (छायाचित्र - साभार इंडियन एक्स्प्रेस)