आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prajapati Case:Cong Demands Modi\'s Resignation After Sting CD

प्रजापती बनावट चकमकः स्‍टींग ऑपरेशननंतर कॉंग्रेसने मागितला मोदींचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुलसी प्रजापती एन्काउंटर प्रकरणी गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी अडचणीत येऊ शकतात. याप्रकरणी गुन्हा मागे घेण्यासाठी प्रजापती यांच्या आईवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दबाव आणल्याचे उघड करणारी एक सीडी प्रसिद्ध करुन काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर आणि खासदार भुपेंद्रसिंह यादव यांनी दबाव आणल्‍याचे या सीडीमध्‍ये दिसत आहे. एका स्‍टींग ऑपरेशनद्वारे ही सीडी तयार करण्‍यात आली होती.

काँग्रेसच्‍या प्रसिद्धी आणि जनसंपर्क विभागाचे प्रमुख अजय माकन यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत एक सीडी प्रसिद्ध केली. ही सीडी प्रजापती समुदायाच्‍याच काही लोकांनी स्‍टींग ऑपरेशन करुन तयार केली होती. त्‍यात प्रकाश जावडेकर, भूपेंद्र यादव आणि रामलाल हे तुलसीराम प्रजापती यांच्या आईला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत असल्याचे दिसत आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून ही सीडी सीबीआयला देण्‍यात येणार असल्‍याचे माकन यांनी सांगितले.