आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चे दलितविरोधी असल्‍याचा संघाकडून प्रचार होतोय- प्रकाश आंबेडकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मराठा मोर्चे हे दलितांविरोधी असल्‍याचा प्रचार राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाकडून सुरू आहे, असे म्‍हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संघावर नेम साधला आहे. एका वृत्‍तवाहिनीशी बोलताना ते म्‍हणाले की, 'मराठा समाजाविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. प्रतिमोर्चे काढणे दलितांच्या हिताचे नव्हे.'
कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर राज्‍यात विविध जिल्‍ह्यांमध्‍ये मराठा समाजाचे मोठ्या संख्‍येने मूक मोर्चे निघाले; अजूनही विविध जिल्‍ह्यांमध्‍ये मोर्चे निघणार आहेत. त्‍या पार्श्‍वभूमिवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्‍हणाले, मराठा मोर्चा हा त्यांना घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करत आहे, याचे मी स्वागत करतो. हा मोर्चा दलितविरोधी असल्‍याचा चुकीचा प्रचार संघाकडून केला जात आहे. मुळात कोपर्डी प्रकरणातील आरोनींना आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनीच पकडून दिले आहे. पण संघाने या प्रकरणाचे राजकारण सुरु केले आहे. मात्र, काही लोक प्रतिमोर्चा काढण्याचे ठरवत असतील तर, असे मोर्चे निघू नयेत असे आपल्‍याला वाटते असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. जे लोक मोर्चे काढतील, ते संघ आणि भाजपच्या हातातील बाहुले झालेले असतील, असेही ते म्‍हणाले.
बातम्या आणखी आहेत...