आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prakash Javadekar News In Marathi, Environment Minister, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकसनशील देशांना श्रीमंत देशांनी पाठिंबा द्यावा, पर्यावरणमंत्री जावडेकर यांचे न्यूयॉर्कमध्ये आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण करण्याच्या कामात श्रीमंत देशांनी विकसनशील देशांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारताने केले आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये वातावरण बदलावर चर्चा करण्यासाठी जगभरातील नेते न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले, या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी न्यूयॉर्कमध्ये आयोजित आर्थिक मंचच्या बैठकीत हे आवाहन केले.

अ‍ॅनेक्स एकमध्ये समाविष्ट देशांनी २०२० नंतरचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम २०२० पूर्वीचे लक्ष्य साध्य करावे. यामध्ये औद्योगिकदृष्टया समृद्ध देशांचा समावेश आहे. आर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेटिव्ह अँड डेव्हलपमेंट(ओइसीडी) याबरोबर इकॉनॉमिक्स इन ट्रांझिशन (इआयटी)देश आहेत. इआयटीमध्ये रशियन फेडरेशन, बाल्टिक देश आणि मध्य व पूर्व युरोपातील अनेक देश आहेत.

विकसनशील देशांची जोरदार भूमिका मांडत जावडेकर यांनी विकसित देशांना तांत्रिक व आर्थिक सहकार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले. अ‍ॅनेक्स दोनमधील देशांनीही तांत्रिक व आर्थिक सहकार्याच्या बळावर हरितगृह वायू उत्सर्जनात कपात करण्यात बांधिलकी दाखवावी, असे जावडेकर म्हणाले. यामध्ये इआयटीमध्ये नसलेले ओइसीडीच्या सदस्य देशांचा समावेश आहे.