आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांच्या सुटीवर जावडेकरांची मल्लिनाथी, ग्रहणांचा अंदाज शक्य, राहुल यांचा नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कथित रजेची चांगलीच खिल्ली उडवली. आकाशातील ग्रहणांचा एक वेळ अंदाज बांधता येतो, मात्र राहुल कधी सुटी संपवून येतील, हे सांगू शकत नसल्याचे जावडेकर म्हणाले.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी काही विशिष्ट आकडेमोड असते. मात्र, राहुल गांधी कधी दिसतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे आपण त्यावर मी काय बोलू शकतो, असे जावडेकर यांनी सांगितले. काँग्रेसने १९ एप्रिलला आयोजित केलेल्या किसान रॅलीमध्ये राहुल गांधी सहभागी होऊ शकतील, अशी शक्यता आहे.
पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जावडेकर यांनी वरील उत्तर दिले. राहुल २२ फेब्रुवारीपासून रजेवर आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याआधी किसान रॅली होत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. भूसंपादन विधेयक शेतकरीविरोधी आणि उद्योगपतींचे हितसंबंध जपणारे असल्याचा आरोप करत संसदेत विरोधक सरकारविरोधात एकवटले आहेत.
राहुल रॅलीत सहभागी होणार आहेत काय अशी सोमवारी विचारणा केल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी राहुल वरिष्ठ नेते नाहीत काय, असा सवाल करत त्यांच्या सहभागाचे संकेत दिले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अमेठी दौऱ्यात राहुल लवकरच लोकांमध्ये येतील, असे सांगितले होते.