आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांत शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल: जावडेकर, जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेतले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक बदल हाेत अाहेत. भविष्यात देशात जागतिक दर्जाचे अद्ययावत शिक्षण उपलब्ध करून देऊ, असा विश्वास मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
 
माेदी सरकारला तीन वर्षे पूर्ण हाेत असताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काय प्रगती केली याबाबत माहिती देताना जावडेकर म्हणाले, देशातील प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळावे ही माेदी सरकारची भूमिका अाहे. विद्यार्थ्याला शालेय शिक्षणातून नेमके काय दिले पाहिजे, याचे निकष निश्चित केले असल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी तिघांचे उत्तरदायित्व वाढले अाहे. जागतिक स्तराचे शिक्षणक्रम शिकवणारी २० नवी विद्यापीठे लवकरच भारतात तयार हाेत अाहेत. यासाठी ५९५ कोटी रुपये खर्च करून शिक्षण क्षेत्रात २५८ नवे प्रकल्प राबवले जातील.

त्यापैकी १० विद्यापीठांचे संचालन सार्वजनिक क्षेत्राद्वारे तर १० विद्यापीठांचे खासगी संस्थांद्वारे होईल. या प्रशिक्षणासाठी विदेशातील २०० प्राध्यापक भारतात आले अाहेत. नव्या शैक्षणिक वर्षात ही संख्या ६०० पर्यंत वाढेल. तंत्रशिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढवण्यासाठी जागतिक बँक सरकारने २६०० कोटींचा निधी पुरवला आहे. बदलत्या परिस्थितीनुसार दर दाेन वर्षांनी अभ्यासक्रम बदलले तरच जागतिक स्पर्धेत भारताचे शिक्षण टिकेल. त्यासाठी सर्व विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. शिक्षणात नवनव्या उपक्रमशीलतेचा अवलंब व्हावा यासाठी शिक्षण मंथन या अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून पुणे, गुवाहाटी, रायपूर, बंगळुरू चंदिगडमध्ये कार्यशाळा आयोिजत केल्या आहेत.
 
शिक्षण व्यवस्थेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी देशातल्या १३६६ शिक्षण संस्थांसाठी ४८१६ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. या निधीतून ६० नव्या आणि ५४ जुन्या महाविद्यालयांचे आदर्श पदवी महाविद्यालयात रूपांतर केले जाईल. व्यावसायिक शिक्षण देणारी २९ महाविद्यालये उभी रहातील. तसेच १६ स्वायत्त महाविद्यालयांचे नव्या विद्यापीठात रूपांतर होईल. मोदी सरकारने नवे आयआयएम,६ नवे आयआयटी, कुर्नूल येथे आयआयआयटी, बहरामपूर तिरूपतीला नवे आयआयएसईआर स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
 
उच्च शिक्षणात संशोधन, नव्या संकल्पनांना प्राधान्य
भारतातसध्या ८०० विद्यापीठे, ४१ हजार ८६४ महाविद्यालये, २३ आयआयटी, २० आयआयएम, ३१ एनआयटी, २० आयआयआयटी आयआयएसईआर एवढ्या संस्था आहेत. त्यात १४,३७,७५३ प्राध्यापक २,८४,८४,७४६ विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवतात. उच्च शिक्षणात संशोधन आणि नव्या संकल्पनांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचे आमचे धोरण आहे.
बातम्या आणखी आहेत...