नवी दिल्ली - गुरुवारी सायंकाळी दिल्लीत प्रचाराच्या तोफा थंडावतील. सर्व राजकीय पक्षांनी प्रचारात पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोठे मोठे नेते आणि दिग्गज रोड शो करत आहे.
आपच्या गुलपनाग याही गेल्या तीन दिवसांपासून प्रचारात व्यस्त आहेत. बुधवारी गुल पनाग यांनी किरण बेदींच्या कृष्णा नगरमध्ये रोड शो केला. दिल्लीत फारसा महिला उमेदवारांना संधी मिळालेली नाही. पण ज्या महिला मैदानात आहेत त्या संपत्तीच्या बाबतीत इतरांच्या पुढे आहेत.
आपने सहा महिला उमेदवार मैदानात उतरवल्या आहेत. त्यापैकी एक आहेत प्रमिला टोकस. 12वी उत्तीर्ण असलेल्या प्रमिला दिल्लीच्या सर्वात श्रीमंत महिला उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 30 कोटींची संपत्ती आहे. तर त्यांचे पती धीरज टोकस यांच्याकडे 57 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्या दिल्लीच्या आर के पुरममधून निवडणूक लढवत आहेत. गेल्यावेळी आपच्या स्टार कार्यकर्त्या शाजिया इल्मी या ठिकाणी उभ्या होत्या.
गृहिणी असलेल्या प्रमिला यांनी पतीला सामाजिक कार्यात हातभार लावला आहे. महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या प्रमिला या गरीब मुलींची मदतही करतात. प्रमिला टोकस या माजी नगरसेवक आहेत. 2012 मध्ये मुनिरका वार्डातून विजय मिळवणाऱ्या त्या पहिल्या अपक्ष उमेदवार होत्या. प्रमिला यांचा जन्म दिल्लीच्या धनसा गावात 4 जून 1977 मध्ये झाला होता.
पुढे पाहा, प्रमिला टोकस यांच्या प्रचाराचे PHOTO