आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranab Mukherjee Curtails Bihar Visit By A Day For Narendra Modi

राष्‍ट्रपतींकडून मोदींसाठी मार्ग मोकळा, बिहार दौरा उरकणार एकाच दिवसात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांना चांगलाच झटका दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्‍या विनंतीनंतर राष्‍ट्रपतींनी बिहार दौरा 26 ऑक्‍टोबरलाच उरकण्‍याचे ठरविले आहे. त्‍यामुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्‍या 27 ऑक्‍टोबरच्‍या सभेसाठी मार्ग मोकळा झाला आहे.

नरेंद्र मोदी यांची पाटण्‍यात 27 ऑक्‍टोबरला हुंकार रॅली आयोजित करण्‍यात आली आहे. याच दिवशी प्रणव मुखर्जींचाही दौरा प्रस्‍तावित होता. मोदींची रॅली फ्लॉप व्‍हावी, यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केल्‍याचा डाव कॉंग्रेस आणि नितीश कुमार यांनी खेळल्‍याचा आरोप होत होता. मात्र, भाजपने राष्‍ट्रपतींना कार्यक्रमात बदल करण्‍याची विनंती केली. मोदींच्‍या कार्यक्रमामुळे राष्‍ट्रपपतींनाच त्रास होऊ शकतो. राष्‍ट्रपतींनी भाजपची विनंती मान्‍य करत आपला दौरा 26 ऑक्‍टोबरलाच उरकण्‍याचे ठरविले आहे. राष्‍ट्रपती 26 तारखेला पाटण्‍यात केवळ दोन तासांसाठीच दाखल होतील. एका दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते उपस्थित राहणार आहेत. त्‍यानंतर ते लगेच दिल्‍लीला परततील. भाजपचे प्रवक्ते आणि खासदार राजीव प्रताप रुडी आणि शाहनवाझ हुसैन यांनी याबाबत स्‍वतः राष्‍ट्रपतींनी माहिती दिल्‍याचे सांगितले.