आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदीच राहणार, ललित मोदी वादानंतर भाजपचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदी यांची मदत केल्याप्रकरणी वादात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भाजप पदावरून हटवणार नाही. वसुंधरा राजे यांच्या विरोधात जे पुरावे सादर केले जात आहेत, ते पुरेसे नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी स्पष्ट केल्याचा दावा एका वाहिनीने केला आहे.

राजे यांचा केला बचाव
भाजपच्या राजस्थान कार्यकारिणी आणि राजस्थान सरकारने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र भाजप खासदार दुष्यंत सिंह यांना पाठिंबा दर्शवला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड म्हणाले की, दुष्यंत सिंह आणि ललित मोदी यांच्या कंपनीमध्ये झालेली देवाण घेवाण ही दोन खासगी कंपन्यांमध्ये झालेला व्यवहार होता आणि तो, योग्य होता.

अमित शहांची भेट नाही
वसुंधरा यांनी शुक्रवारी अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली नाही. शुक्रवारी पंजाबच्या आनंदपूर साहीबच्या 350व्या स्थापना दिनावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून आपली बाजू मांडणार असा अंदाज वर्तवला जात होता. पण नंतर त्या अानंदपूर साहीब येथील कार्यक्रमाला जाणार नसल्याचे फॅक्सद्वारे कळवण्यात आले.

ललित मोदींनी घेतले प्रणवदांचे नाव
वादात अडकलेल्या ललित मोदींच्या दाव्यानुसार, 2010 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ED (अंमलबजावणी संचलनालय)ला त्यांच्या विरोधात चौकशी करण्यास सांगितले होते. त्यांनी 11 एप्रिल 2010 ला आयपीएल फ्रँचायजीचे 25 टक्के शेअर सुनंदा पुष्कर यांच्याकडे असल्याचे ट्विट केले होते. ललित मोदी म्हणाले की, यामुळे भारतीय राजकारणात भूकंप आला. त्यानंतरच तपाससंस्था माझ्या मागे लागल्या. त्याची माहिती मला माझ्या वकिलांकडून मिळाली. याप्रकरणी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी एक बैठकही घेतली होती. 18 तारखेला शशी थरूर यांना राजीनामा द्यावा लागला आणि 25 एप्रिलच्या मध्यरात्री बीसीसीआयने आयपीएलच्या अध्यक्षपदावरून मला निलंबित केले.

मुरली मनोहर जोशींनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शन मंडळाचे सदस्य मुरली मनोहर जोशी गुरुवारी सायंकाळी सुषमा स्वराज यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी मार्गदर्शक मंडळातील सदस्य असलेल्याच लालकृष्ण आडवाणी यांनी अजूनही आणीबाणीची शक्यता फेटाळता येत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर विरोधकांनी मोदींवर हल्ला चढवला होता. सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी हे अडवाणी गटातले असल्याचे मानले जाते.
बातम्या आणखी आहेत...