आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranab’S Daughter Sharmistha Joins Delhi Congress

राष्ट्रपती कन्येच्या रुपात काँग्रेसला मिळाला नवा चेहरा, शर्मिष्ठा मुखर्जी लढणार निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जीच्या रूपाने काँग्रेसला दिल्लीमध्ये आगामी निवडणूकीसाठी नवीन चेहरा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच शर्मिष्ठा यांनी दिल्ली काँग्रेसचे सभासदत्व स्वीकारले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शर्मिष्ठाला ग्रेटर कैलाश भागातून निवडणूकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते.
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शर्मिष्ठा म्हणाल्या की, मी नुकतेच दिल्ली काँग्रेसची प्राथमिक सदस्य झाली आहे. निवडणूक लढवण्याबद्दल विचारले असता शर्मिष्ठा यांनी सकारात्मक प्रतिक्रीया दिली. जर पक्षाला वाटते मी निवडणूक लढावी, तर मी नक्कीच निवडणूक लढवेन, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग
शर्मिष्ठा यांनी दिल्ली काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यास सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांमध्ये शर्मिष्ठा यांनी वीज कपात विरोधात दिल्लीमध्ये काढण्यात आलेल्या "कँडल मार्च"मध्ये सहभाग नोंदवला होता. जुलैच्या सुरुवातीला काँग्रेसने संसदेसमोर केलेल्या आंदोलनातही त्या सक्रीय होत्या.
लवकरच मिळणार मोठी जबाबदारी
काँग्रेसचे महासचिव आणि दिल्लीचे प्रभारी सकील अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली प्रदेश काँग्रेस कमेटीची पुनर्बांधणी लवकरच होईल. यामध्ये शर्मिष्ठा यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल. अहमद म्हणाले की, "शर्मिष्ठामध्ये सळसळते तरूण रक्त आहे, तसेच त्या स्वतः एका राजकीय कुटुंबात वाढल्या आहेत. यामुळे त्यांना राजकारणबाबत चांगली समज आहे. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणूकीत त्यांच्या क्षमतेची आम्हाला मदत होईल.
कथ्थक नृत्यांगना आहेत शर्मिष्ठा
सेंट स्टीफन महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या शर्मिष्ठा कथ्थक नृत्यात पारंगत आहेत. त्यांचे भाऊ अभिजीत पूर्वीपासूनच पश्चिम बंगालच्या जंगीपूरा येथील खासदार आहेत.
फाईल फोटो - शर्मिष्ठा आणि प्रणव मुखर्जी