आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Bhushan Against The Delhi Government In Supreme Court

दिल्ली सरकारविरुद्ध प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जनतेच्या काेट्यवधी रुपयांचा दुरुपयोग करत दिल्ली सरकारने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांत मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप करून हा
प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या १३ मे रोजी दिलेल्या निकालाचे उल्लंघन असल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने जनतेच्या निधीतून कोट्यवधी रुपयांची जाहिरात केली आहे. आज या जाहिराती विविध वाहिन्यांवर दाखवल्या जात असून या जाहिरातीद्वारे फक्त मुख्यमंत्र्यांच्या कामाचाच प्रचार करण्यात आला असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
भूषण यांनी अशाच प्रकारे एआयडीएमकेच्या नेतृत्वाखालील तमिळनाडूतील सरकारविरुद्धही याचिका दाखल केली आहे. दरम्यान न्यायमूर्ती रंजन गोगई यांनी केजरीवाल सरकारला या प्रकरणी नोटीस बजावण्यास नकार दिला आहे. मात्र, अशा प्रकरणात दोषींविरुद्ध कारवाई करण्यासाठी तीन सदस्यांची समिती का स्थापन केली नाही, याबाबत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून खुलासा मागवला आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.