आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Bhushan Says Controlling New Mlas Aaps Biggest Challenge News In Marathi

Vote विकत घेणार्‍यांना Aap ने दिली उमेदवारी; वरिष्ठ वकील शांती भूषण यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) संस्थापक सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. नवनिर्वाचित आमदारांना 'नियंत्रित' ठेवणे पक्षासमोर मोठे आव्हान असणार असल्याचे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ने मते विकत घेणार्‍यांना उमेदवारी दिल्याचा आरोप ज्येष्ठ वकील शांती भूषण यांनी केला आहे. शक्य त्या मार्गाने 'आप'च्या उमेदवारांनी मते मिळवल्याचेही शांती भूषण यांनी म्हटले आहे. शांती भूषण हे प्रशांत भूषण यांचे वडील आहेत.

दिल्ली विधानसभेत प्रशांत भूषण यांनी स्वत:ला लांब ठेवले होते. परंतु, आता दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या 'आप'समोर सवाल उभे केले आहेत. तसेच प्रशांत भूषण 'आप'च्या विजयोत्सवात देखील दिसले नव्हते.

नवनिर्वाचित आमदारांना 'नियंत्रित' ठेवणे हे पक्षासमोर सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. नवे आमदार भविष्यात आपल्या पक्षाच्या सिद्धांताशी तडजोड तर करणार नाहीत ना, याची शहानिशा वेळीच करून घ्यायला हवी, असा सल्ला देखील प्रशांत भूषण यांनी दिला आहे.

यापूर्वी प्रशांत भूषण यांनी 'आप'च्या काही उमेदवारांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अन्य पक्षातून 'आप'मध्ये सहभागी झालेले नेते अनैतिक असून निवडणूक लढविणे हे त्यांच्यासाठी एक बिझनेस बनला असल्याचे प्रशांत भूषण म्हणाले होते.
दुसरीकडे, 14 फेब्रुवारीलाच 'आप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. याच दिवशी अरविंद केजरीवाल रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.