आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगेंद्र-प्रशांत भूषण यांचा ‘स्वराज इंडिया’ पक्ष स्थापन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या राजकारणात गांधी जयंतीच्या दिवशी दोन नवे राजकीय पक्ष अस्तित्वात आले. १८ महिन्यांपूर्वी ‘आप’मधून हकालपट्टी झालेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी ‘स्वराज इंडिया’ हा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून हकालपट्टी झालेल्या सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच हा पक्ष स्थापन केला.

योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, आनंदकुमार आणि अजित झा यांनी आम आदमी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर ‘स्वराज्य अभियान’ संस्था स्थापन केली होती. हे सर्व जण स्वराज इंडिया या नव्या पक्षातही सहभागी आहेत. योगेंद्र यादव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अजित झा राष्ट्रीय सरचिटणीस तर आनंद कुमार मार्गदर्शक असतील. प्रशांत भूषण आणि शांतीभूषण पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत.

भाजपला हरवण्यासाठी नवा पक्ष : वेलिंगकर
गोव्यात नवा पक्ष सुरक्षा मंच स्थापन करणारे सुभाष वेलिंगकर म्हणाले की, भाजपला हरवणे हे माझे उद्दिष्ट आहे. भाजपने क्षेत्रीय भाषा प्रकरणात जनतेला धोका दिला आहे. नवा पक्ष राज्याच्या हितासाठी काम करेल. आम्ही आघाडीसाठी शिवसेना आणि गोवा प्रजा पार्टीशी चर्चा करत आहोत. नवा पक्ष स्थापन झाल्यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया आली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर म्हणाले की, भाजप सत्तारूढ पक्ष आहे. राज्यात नवे पक्ष स्थापन होणे आमच्यासाठी चांगलेच आहे.
बातम्या आणखी आहेत...