आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratibhtai Patil Returned Gift To The Rashtrapati Bhavan

प्रतिभाताई पाटील यांच्याकडून भेटवस्तू राष्ट्रपती भवनाला परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळात देश-परदेशातून मिळालेल्या विविध भेटवस्तू माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नुकत्याच राष्ट्रपती भवनाकडे रीतसर परत केल्या. त्या अगोदर भेटवस्तू कुटुंबीयांच्या मालकीच्या अमरावतीमधील शाळेत शोभेसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
राष्ट्रपतिपदावर असताना पाटील यांना 155 मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या वस्तू अमरावतीमधील विद्याभारती शैक्षणिक मंडळ संस्थेत मांडण्यात आल्या होत्या. परंतु 22 मे रोजी त्यांनी त्यापैकी काही भेटवस्तू परत केल्या.
राष्ट्रपती भवनातील कला विभागाचे उपसंचालकांकडे त्यांना जमा करण्यात आले आहे. माहिती हक्क कायद्याखाली करण्यात आलेल्या अर्जावर राष्ट्रपती भवनाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले. सुभाष अग्रवाल यांच्याकडून अर्ज करण्यात आला. 3 ऑक्टोबर 2012 रोजी अनेक वस्तू राष्ट्रपती भवनात परत ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शाळेसोबत करार
विद्या भारती शैक्षणिक मंडळ (अमरावती) आणि राष्ट्रपती भवन यांच्यात झालेल्या करारानंतर या शाळेमध्ये भेटवस्तू मांडण्यात आल्या होत्या.
कोणाकडून भेटवस्तू ?
ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून राष्ट्रपतींना मेणबत्तीचा संच, नेल्सन मंडेला यांच्याकडून सुवर्णपदक, रौप्य पदक तर चीनकडून भेटवस्तूंचा बॉक्स त्यांना मिळाला होता.
36 कलावस्तू राष्ट्रपती भवनाकडे सुपूर्द