आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pravin Thipsay Outed A Chess Cheat And Got His Mojo Back News In Marathi

बुद्धीबळ स्पर्धेत हायटेक चिटिंग; दिल्‍लीत स्पर्धा, हरियाणातून चाल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: चेसदरम्यान फसवणूक करणारा ध्रुव कक्कड आणि ग्रॅंडमास्टर प्रवीण थिपसे)

नवी दिल्ली- क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे प्रकार आता सर्वसामान्य झाले आहे. परंतु आता बुद्धीबळ स्पर्धेत हायटेक चिटिंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत हरियाणाच्या एका खेळाडूला चिटिंग करताना रंगेहाथ पकडण्‍यात आले आहे.

ग्रॅंडमास्टर प्रवीण थिपसेविरुद्ध बुद्धीबळ खेळताना 19 वर्षीय इंजीनियर ध्रुव कक्कडने हायटेक चिटिंग केल्याचे निदर्शनास आले. त्याने मोबाइल नेटवर्कच्या माध्यमातून बुद्धीबळ खेळताना चिटिंग केली.

दिल्लीत डॉ.हेडगेवार ओपेन चेस टूर्नामेंटच्या पाचव्या फेरीत शुक्रवारी (29 एप्रिल) प्रवीण थिपसेविरुद्ध आरोपी ध्रुव कक्कडमध्ये सामना सुरु होता. ध्रुव वेगात चाल करत होता. ध्रुव कोणताही विचार न करता झटपट चाल करत असल्याचे पाहून त्याच्यावर पंचाना संशय आला. त्याची झडती घेण्यात आल्यानंतर त्याचे पितळ उघडे पडले. ध्रुवकडून मोबाइल चीप आणि त्याच्या कानाला ईयर फोन जप्त करण्‍यात आला.

ध्रुवच्या फास्ट खेळ पाहून हैराण झाला ग्रॅंडमास्टर
मुंबईचे चेस ग्रॅंडमास्टर प्रवीण थिपसे (55) सोबत ध्रुव खेळत होता. प्रवीण म्हणाले की, 'ध्रुव सुरुवातीपासूनच वेगात खेळत होते. झटपट चाल करत होता. त्याचा खेळ पाहून मी हैराण झालो होतो. ध्रुवसमोर मला एक चाल चालण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ लागत होता. मला वाटले की, माझ्यासमोर दुसरा विश्वनाथन आनंद बसला आहे.' अखेर ध्रुवने 87 मूव्हमध्ये प्रवीण यांचा पराभव केला. परंतु, ध्रुवचे पितळ उघडे पडल्यानंतर प्रवीण यांना विजयी घोषित करण्‍यात आले.

असा पकडला गेला ध्रुव...
ध्रुव कोणताही विचार न करता एक-एक घर पुढे सरकत असल्यामुळे प्रवीण यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ध्रुव खेळत काही होता आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज काही वेगळेच सांगत होती. तो प्रत्येक चाल करण्‍यापूर्वी पायावर गोंदलेल्या टॅटूला पाहात होता. या टॅटूकडे पाहून प्रवीण यांच्या मनातील संशय आणखी बळावला. प्रवीण यांनी टूर्मामेंटच्या आयोजकांकडे तक्रार करून सगळा प्रकार सांगितला. तक्रारीनंतर ध्रुव कक्कडची संपूर्ण बॉडी स्कॅन करण्‍यात आली. ध्रुवकडे दोन मोबाइल फोन, कानात ईयरफोन आदी उपकरणे सापडली. एक मोबाइल त्याने पायात घातलेल्या मोज्यात तर दुसरा पोटाला चिटकवलेला होता. कक्‍कडचा एक मित्र हरियाणा बसून त्याला कॉम्प्युटरच्या मदतीने ध्रुवला मार्गदर्शन करत होता.

दरम्यान, प्रवीण म्हणाले, 'ध्रुवचा खेळ शानदार होता. थिपसे यांनी एक घर खेळल्यानंतर ध्रुव आपल्या पायावर थाप मारायचा. ध्रुव हरियाणात कॉम्प्युटरसमोर बसलेल्या मित्राला संकेत देत होता. ध्रुवच्या एका पायाच्या मोज्यात एक मोबाइल आढळून आला. ध्रुवची चाल चुकली तर तो पुन्हा एकदा पायावर थाप मारत असे तसेच चाल बरोबर असायची तेव्हा तो दोनचा थाप मारयला. मात्र, ध्रुवच्या फूट-टॅपिंगमुळे प्रवीण परेशान झाले होते. ध्रुवचा मित्र त्याला कॉम्प्युटरच्या मदतीने मूव्ह करायला सांगायचा. ध्रुव कानाजवळ लावलेल्या मायक्रो ईयरफोनच्या मित्राचे बोलणे ऐकत होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...