आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरोदर महिलांनी सेक्स करणे, नॉनव्हेज खाणे टाळावे, मोदी सरकारचा \'बुकलेट\'मधून सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गर्भवती महिलांनी सदृढ बाळाला जन्म देण्यासाठी सेक्स करणे आणि नॉनव्हेज खाणे टाळायला हवे. तसेच गर्भवती महिलांनी बेडरूममध्ये बाळाची सुंदर-सुंदर पोस्टर लावावेत, असा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने 'आयुष प्रीस्क्रिप्शन'मधून सल्ला दिला आहे.

गरोदर महिलांनी डोक्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत, असेही मोदी सरकारने म्हटले आहे. मोदी सरकारने सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी सरकार कायम चर्चेत राहाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मोदी सरकारने गर्भवती महिलांसाठी बुकलेट प्रसिद्ध केल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
आयुषमंत्रींच्या उपस्थिती बुकलेटचे वितरण...
- देशात दरवर्षी जवळपास 2.6 कोटी मुले जन्माला येतात. गरोदर महिलांना सल्ला दिला आहे.
- 'मदर अॅण्ड चाइल्ड केअर' नामक बुकलेटचे एका कार्यक्रमात वितरण करण्‍यात आले.
- आयुष मंत्री श्रीपद नाईक यांच्या नेतृत्त्वात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बुकलेटचे प्रकाशन करण्‍यात आले.
- 'सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योगा अॅण्ड नेचुरोपॅथी' ने हे बुकलेट प्रसिद्ध केले आहे.
- गरोदर महिलांनी राग, संताप, तणावापासून नेहमी दूर राहावे. सेक्स करणे टाळावा तसेच सकारात्मक विचार करावा.
- आयुष मंत्री श्रीपाद नाईक सध्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परदेशात आहेत.
बातम्या आणखी आहेत...