आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Premraj Das Guards, Cleans, Eats, And Sleeps In Public Toilet At Delhi

जेवणापासून झोपण्यापर्यंत, काही अशी आहे दिल्लीच्या या टॉयलेट गार्डची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरात लोक नोकरी यासाठी करतात की त्यांना लग्झरियस लाइफ जगता आली पाहिजे. मात्र काही जॉब्स असेही असतात ज्यांना डर्टी जॉब्स म्हटले जाते. अशीच एक नोकरी येथील नॉर्थ-ईस्ट भागात राहाणारे 40 वर्षांचे प्रेमराज दास करत आहेत. प्रेमराज यांची नोकरी टॉयलेट सुरक्षा रक्षकाची आहे.

टॉयलेटमध्येच राहातात आणि तिथेच खानपान
नवी दिल्लीतील टॉयलेटमध्ये स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक म्हणून प्रेमराज काम करतात. दोन कामे आणि 24 तास कार्यरत राहाण्यासाठी त्यांना सात हजार रुपये एवढा कमी पगार मिळतो. टॉयलेच्या स्वच्छतेची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागते. या टॉयलेटमधीलच एका रुममध्ये प्रेमराज यांनी संसार थाटला आहे. येथेच ते स्वतःसाठी स्वंयपाक करतात आणि रात्र झाली की हाच त्यांचा निवारा असतो.

तीन मुलांचे पिता आहे प्रेमराज
प्रेमराज यांचे कुटुंब नॉर्थ-ईस्ट भागात राहाते. त्यांना तीन मुले आहेत. त्यांचा पूर्ण पगार कुटुंबाच्या गरजा भागवण्यात संपून जातो. प्रेमराज सांगतात, टॉयलेटची स्वच्छता आणि सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. तीन वर्षांपासून मी हे काम करत आहे. आता येथे राहाण्याची सवय झाली आहे. मी टॉयलेटच्या आतच स्वतःसाठी जेवण तयार करतो आणि रात्री येथेच कांबळ टाकून आराम करतो.

या कामातही प्रेमराज यांनी त्यांची सकारात्मकता जिवंत ठेवली आहे. ते सांगतात, येथे मला रोज 400 नवे लोक भेटतात, त्यांच्यासोबत बोलणे होते, नव्या गोष्टी कळतात. रात्री 9 नंतर मात्र मी एकटा असतो. इच्छा असूनही कोणाला भेटता येत नाही.

प्रेमराज यांनी सांगितले, की ही अतिशय घाणेरडी नोकरी आहे, मात्र या नोकरीमुळे मला पगार मिळतो आणि माझे घर चालते. माझ्या कुटुंबियांनाही माहित आहे की मी काय काम करतो. माझी पत्नी आणि मुलांना माझ्या नोकरीचे महत्त्व कळते. इतरांप्रमाणे मलाही प्रतिष्ठेची आणि चांगल्या पगाराची नोकरी करण्याची इच्छा आहे, तसा शोधही मी घेतला परंतू तशी नोकरी अजून मिळाली नाही. त्यामुळे हे काम मी यापुढेही करत राहाणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रेमराज कसे राहातात टॉयलेटमध्ये...