आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Preparation In Madison Square Garden Where Modi Will Address NRI's

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: अमेरिकेतील मोदींच्या \'मेगा शो\'साठी सजत आहे मेडिसन स्क्वेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्‍यात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेण्याशिवाय आणखी एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन येथील मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे एका सभेला ते संबोधीत करणार आहेत. 28 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार असून मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भाषण करणारे मोदी पहिले परदेशातील शासनप्रमुख ठरणार आहेत. 20 हजार लोक बसतील एवढी या स्टेडियमची क्षमता आहे. जगातील महागड्या आणि लोकप्रिय स्टेडियम पैकी ते एक आहे. मोदींचे येथील भाषण एवढे महत्त्वाचे का आहे, आणि या कार्यक्रमासाठी अनिवासी भारतीयांनी काय तयारी केली आहे, आता हे जाणून घेऊया.
मोदींसाठी का महत्त्वाचे आहे मेडिसन स्क्वेअर गार्डनमधील भाषण
- येथे मोदी भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधीत करणार आहेत.
- अनिवासी भारतीय मोदींचे मोठे समर्थक आहेत. त्यांनी आधीही मोदींना व्हार्टन येथे बोलावले होते.
- अमेरिकेमध्ये विशेषतः न्यूयॉर्कच्या आसापास क्विन्सबरो, न्यूजर्सीमध्ये एडिसन सिटी येथे गुजराती मोठ्या प्रमाणावर आहेत. ते मोदींना प्रत्यक्ष पाहू शकतील.
- गुजरात दंगलीनंतर अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता. त्यानंतर अनेक गुजराती नागरिकांनी त्यांच्या व्हिसासाठी अमेरिकेकडे आग्रह धरला होता. येथील भाषणातून ते गुजराती नागरिकांना धन्यवाद देऊ शकतील.
- भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधीत करताना मोदी संपूर्ण अमेरिकेला उद्देशून बोलण्याची शक्यता आहे. त्यासाठी मेडिसन स्क्वेअर गार्डन हे उत्तम ठिकाण ठरु शकते.
याला मोदींनी दिला नकार
- अशी चर्चा आहे, की या कार्यक्रमाला मोठ्या रकमेचे तिकीट लावले जाणार होते, मात्र मोदींनी त्याला नकार दिला.
- कॅश फॉर डिनर (पैसे देऊन पंतप्रधान मोदींसोबत भोजनाची संधी). मोदींनी म्हटले ही अमेरिकेतील पद्धत असू शकते, मात्र भारताच्या पंतप्रधानांना हे शोभनीय नाही.
- देणगीदारांसोबत फोटो. मोदी म्हणाले, पैशांच्या बदल्यात काहीही करणार नाही.
दोन हजार पास सिनेटर, बुद्धीजीवी आणि उद्योजकांना
मेडिसन स्क्वेअर येथील कार्यक्रमाचे आयोजन इंडियन - अमेरिकन कम्यूनिटी फाऊंडेशनने केले आहे. जवळपास दोन हजार पासचे वाटप सिनेटर, बुद्धीजीवी आणि उद्योजकांना करण्यात आले आहे. उर्वरीत 18 हजार लोकांना निःशुलक प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी रविवारपर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले जात आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास 4 कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमाच्या स्थळ संशोधनासाठी भाजप नेते विजय जॉली आणि खासदार राज्यवर्धन राठोर यांनी अमेरिकेच्या 20 शहरांचा दौरा केला होता. त्यात सर्वाधिक योग्य मेडिसन स्क्वेअर गार्डन असल्याचे त्यांनी ठरविले.
थ्री-डी लाइव्ह टेलिकास्ट
मेडिसन स्क्वेअर गार्डनची क्षमता मर्यादित आहे, त्यामुळे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. लाइव्ह थ्री-डी प्रसारणाचे हक्क उपग्रह वाहिण्यांना देण्यात आले आहेत.
यासाठी प्रसिद्ध आहे, मेडिसन स्क्वेअर
1969 मध्ये प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली आणि जो फ्रेजर यांच्यातील ऐतिहासिक सामना येथेच रगंला होता.
1972 मध्ये अॅल्व्हिस प्रिस्लेने येथेच सलग चार हाऊसफुल परफॉर्मेन्स दिले होते.
प्रसिद्ध पॉप गायक अॅल्टन जॉन याने याच गार्डनमध्ये 64 शो केले होते.
.... आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे भाषण केल्यानंतर या स्टेडियममध्ये परदेशातील शासनकर्त्याने भाषण करण्यीची पहिली वेळ असेल.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मेडिसन स्क्वेअरची छायाचित्र