आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याच्या ताटात जेवणार ट्रम्प कन्या इव्हांका, बँकॉकच्या फुलांनी होईल वेलकम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका. - Divya Marathi
अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका.

नवी दिल्ली/हैदराबाद - अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांकाच्या नेतृत्वात परिषदेत अमेरिकी प्रतिनिधी भारतात आले आहेत. इव्हांका 28 ते 30 नोव्हेंबरपर्यंत हैदराबादमध्ये होणाऱ्या ग्लोबल इकॉनॉमिक समिट (जीईएस) मध्ये सहभागी होत आहेत. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील. या वेळी इव्हांका हैदराबादमध्ये थांबणार आहेत. येथेच त्यांची खातीरदारी केली जाणार आहे.

 

चांदीच्या अन् सोन्याच्या ताटात वाढले जाणार जेवण...
- थायलंडच्या बँकॉक, सिंगापूर, इंडोनेशिया आणि बंगळुरूमधील फुलांनी इव्हांका यांचे वेलकम केले जाईल.
- त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यासाठी ताज हॉटेलमधून वेगवेगळ्या शेफ्सना बोलावण्यात आले आहे, ते स्पेशल डिशेस तयार करतील.
- इव्हांका यांच्यासाठी बनणारी प्रत्येक डिशसाठी वेगवेगळ्या शेफची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबत त्यांच्यासाठी कटलेटही तयार करण्यात येईल.
- तथापि, इव्हांका यांना जेवण वाढण्यासाठी चांदी आणि सोन्याच्या ताटांचा वापर केला जाणार आहे. त्यांचे डिनर फलकनुमा पॅलेसमध्ये होईल.

 

अशी असेल इव्हांकासाठी सिक्युरिटी
- इव्हांका ट्रम्प हैदराबादेत इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर, फलकनुमा पॅलेस आणि मियापूर या तीन ठिकाणी सहभागी होणार आहेत.
- त्यांची सुरक्षेसाठी सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. यात तेलंगणाची इलिट ग्रेहाउंडचे एक्स्पर्ट निशाणेबाज (अँटी नक्षल फोर्स) तसेच ऑक्टोपस कमांड (अँटी टेरर) यांचा मुख्य सहभाग आहे.
- कमांडो रशियन मेड रायफल्स आणि अत्याधुनिक हत्यारांनी लेस राहतील. सूत्रांनुसार, तेलंगण कमांडोज दरगुनोव स्नायपरने लेस असतात.
मीडिया रिपोर्टसनुसार, इव्हांका यांची सुरक्षा यूएस सीक्रेट सर्व्हिसद्वारे पाठवण्यात आलेल्या तीन बुलेटप्रूफ लिमोजिन कार भारतात येणार आहेत.
- सुरक्षेसाठी RAW, SPG, IB इत्यादी सुरक्षा संस्थांची सातत्याने बैठक सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इव्हांका ट्रम्पचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...