आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयींना \'भारतरत्न\' प्रदान, प्रोटोकॉल तोडून राष्ट्रपतींनी घरी जाऊन दिला पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भरतरत्न देताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.)
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न'ने सन्मानीत करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना 'भारतरत्न' प्रदान केला. दिल्लीतील कृष्ण मेनन मार्ग येथील वाजपेयींच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथसिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि मोजक्या निमंत्रीतांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी एक मंडप उभारण्यात आले. येथेच मुख्य कार्यक्रम झाला आहे. माध्यमांना कार्यक्रम स्थळापासून दूर ठेवण्यात आले. माध्यमांसाठी जी जागा देण्यात आली तेथून ना व्हीआयपींच्या हलचाली दिसत होत्या ना, वाजपेयींना सन्मानित केले जाणार तो मुख्य कार्यक्रम. फक्त डीडी नॅशनल आणि एएनआय यांनाच वार्तांकनाची जबाबदारी देण्यात आली होती.
अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्याची घोषणा गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी करण्यात आली होती. जेव्हा त्यांना भारतरत्न दिला जाणार याची माहिती देण्यात आली होती, तेव्हा ते फक्त थोडेसे हसले होते. पण दोन दिवसांपूर्वी जेव्हा त्यांना सांगितले, की 27 तारखेला राष्ट्रपती स्वतः घरी येऊन त्यांना हा सन्मान देणार आहेत, त्यावर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. ही माहिती देणार्‍या व्यक्तीकडे ते केवळ पाहात होते. अटलजी गेल्या काही वर्षांपासून आजारी असून अंथुरणाला खिळले आहेत. त्यांना अल्झायमर डिमेंशिया आहे.
पुढील स्लाईडवर बघा, वाजपेयी यांच्या घरी झालेल्या छोटेखानी समारंभाचे EXCLUSIVE फोटो...
बातम्या आणखी आहेत...