आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयनाथ मंगेशकर, शफाअत खानना संगीत नाटक अकादमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, नेपथ्यकार प्रदीप मुळये, नाटककार शफाअत खान यांच्यासह लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेखिका व समीक्षिका शांता गोखले यांना अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष २०१५चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख आणि ताम्रपट असे आहे. तर, शिष्यवृत्ती स्वरूपात ३ लाख रुपये प्रदान करण्यात आले.

संगीत नाटक अकादमीच्या वतीने ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान आयोजित ललित कला महोत्सवात छाया व माया खुटेगावकर यांचे लावणी सादरीकरण होणार आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे सुगम गायनही होणार आहे. दिल्लीत चाणक्यपुरीत कथक केंद्राच्या विवेकानंद सभागृहात हे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता कोपर्निकस मार्गवरील मेघदूत सभागृहात पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजता नाटककार शफाअत खान यांची प्रकट मुलाखत भगवानदास मार्ग स्थित अभिमंच सभागृहात होणार आहे. या महोत्सवात संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...