नवी दिल्ली- राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत सुषमा स्वराज यांनी शनिवारी आपली भूमिका मांडली. सुषमा यांनी सांगितले की, या सर्व अफवा आहेत. मी एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर असून तुम्ही जे मला विचारत आहात तो इंटरनल मॅटर आहे. दुसरीकडे RSS ने मोहन भागवत हे राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नसल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत एनडीए आणि यूपीएने आपले राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित केलेले नाहीत. सर्वसंमतीने राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजपने एक समितीही बनवली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
भागवतांच्या उमेदवारीवर शिवसेनेने डायल केला राँग नंबर
- शिवसेना RSS प्रमुख मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवत आहे. यावर RSS ने स्पष्ट केले आहे की भागवत हे राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नाहीत.
- RSS चे राकेश सिन्हा म्हणाले, "सर्वप्रथम मी शिवसेनेचे भागवत यांच्यावर विश्वास दर्शविल्याबद्दल आभार मानतो. परंतु शिवसेनेने राँग नंबर डायल केला आहे.
- स्वत: भागवत यांनी ही गोष्ट नाकारली असून ही एक चांगली मनोरंजक बाब असल्याचे म्हटले आहे.