आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Give Permission To Step Down Vishwabharati Vice Chancellor

विश्वभारतीच्या कुलगुरूंना बडतर्फ करण्यास दिली मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्यास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे प्रवक्ता घनश्याम गोयल यांनी सोमवारी दिली. दत्तगुप्ता यांच्यावर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमतता केल्याचे आरोप होते. कायदा मंत्रालय आणि अॅटर्नी जनरल यांनी या प्रकरणात कारवाई पूर्ण केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दत्तगुप्ता यांच्या बडतर्फीच्या शिफारशीची फाइल राष्ट्रपतींकडे पाठवली होती.