आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Interfering In Shikh Riots Suffered For Justic

शीख दंगलीतील पीडितांच्या न्यायासाठी राष्‍ट्रपतींनी हस्तक्षेप करावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 1984 च्या शीख दंगलीप्रकरणी विविध राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. दंगलीतील पीडितांना न्याय देण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करा, असे आदेश राष्ट्रपतींनी सरकारला द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने प्रणवदांकडे केली. दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची दिल्ली सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर शीख समुदाय संतापला आहे.

दंगलीत हात असूनही सज्जनकुमारसह दोषींविरुध्द कारवाई करण्यासाठी राजधानी दिल्ली,पंजाबमध्ये उग्र आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. भाजप, शिवसेनेसह शिरोमणी अकाली दल, समाजवादी पार्टी, तेलुगू देसम, झामुमो, राष्ट्रीय लोकदल, बिजू जनता दल आणि जद-यू अशा दहा पक्षांचे नेते आणि खासदारांनी राष्ट्रपती भवनात प्रणवदांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शीख समुदायाच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या सरकारने त्वरित मान्य क राव्यात, असे आदेश राष्ट्रपतींनी द्यावेत, अशी विनंती शिष्टमंडळाने केली आहे.