आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • President Knew That Babri Mosque Was Going To Be Demolished

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबरी विद्ध्‍वंसाची राष्‍ट्रपतींना पूर्वीपासून होती माहिती- मुलायम यादव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- समाजवादी पार्टीचे अध्‍यक्ष मुलायम सिंह यादव यांनी एक खळबळजनक गौप्‍यस्‍फोट केला आहे. अयोध्यातील बाबरी मशिद पाडण्‍यात येणार असल्‍याची माहिती तत्‍कालीन राष्‍ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांना पूर्वीपासून होती, असा दावा मुलायम सिंह यादव यांनी केला आहे.

जनेश्‍वर मिश्र यांच्‍या जयंतीनिमित्त आयोजि कार्यक्रमात यादव यांनी हा गौप्‍यस्‍फोट केला. ते म्‍हणाले, बाबरी मश्जिद पाडण्यात यावी यासाठी अनेक व्यक्तींचा याला पाठिंबा होता. परिस्थितीची माहिती देण्‍यासाठी मी राष्‍ट्रपतींना पत्र पाठविले होते. त्‍यानंतर त्‍यांची भेट घेऊन हिंदू संघटनांच्‍या कारस्‍थानाबाबत माहिती दिली. त्‍यावेळी त्‍यांनी आजूबाजूला पाहिले आणि म्‍हणाले, मशिद पाडण्‍यात येणार असल्‍याची ही माहिती गोपनीय ठेवा. राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांचाही याला पाठिंबा होता. बाबरी मशिदीबाबत आपण तोंड उघडले तर अनेकांचे पितळ उघडे पडेल. त्‍यामुळे या वादावर पुस्‍तक लिहिण्‍यापासून रोखण्‍यात आले, असेही यादव म्‍हणाले.

शंकरदयाल शर्मा यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. परंतु, मुलायम सिंह यादव सातत्‍याने या वादग्रस्‍त मुद्यावरुन वक्तव्‍य करत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीत एका विशिष्‍ट समुदायाला उद्देशून हे राजकारण होत असल्‍याचे दिसत आहे.