आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रपतींच्या इफ्तार पार्टीला मोदींची सलग तिसऱ्या वर्षी अनुपस्थिती, जेटली पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी रात्री इफ्तार पार्टी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्या वर्षी या पार्टीला जाण्याचे टाळले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल खेद व्यक्त केला. सरकारच्या वतीने अरुण जेटली उपस्थित होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या इफ्तार पार्टीला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

कोण-कोण आले पार्टीला
> राष्ट्रपती भवनातील ऑडिटोरियम अॅनेक्समध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
> यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, सोनिया गांधी, जेटली, मुख्तार अब्बास नकवी सहभागी झाले होते.
> राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, मोहसिना किडवई, सीताराम येचुरी उपस्थित होते.
> पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्यासह अनेक डिप्लोमॅट इफ्तार पार्टीला उपस्थित होते.
> पार्टीमध्ये प्रणव मुखर्जी आल्यानंतर उपराष्ट्रपतींनी त्यांचे स्वागत केले.
बातम्या आणखी आहेत...