आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Mukherjee"s Memoirs, The Turbulent Years: 1980 96

राम मंदिर खुले करणे ही चूक, बाबरी मशिद पाडणे हा विश्‍वासघात- राष्ट्रपती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अयोध्येमधील राम मंदिर खुले करणे हा राजीव गांधी यांचा चुकीचा निर्णय होता. तसेच बाबरी मशिद पाडणे हादेखिल पूर्णपणे विश्वासघात होता. या निर्णयामुळेच देशाच्‍या प्रतिमेला तडा गेला, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मकथेत व्यक्त केले आहे. मुखर्जी यांच्या ‘द टर्ब्युलेंट इयर्स : 1980..1996’ या पुस्तकाचे उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीत प्रकाशन करण्‍यात आले. या पुस्‍तकात त्‍यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
राष्‍ट्रपती मुखर्जी यांच्‍या आत्‍मकथेत अनेक महत्‍त्वपूर्ण खुलासे करण्‍यात आले आहेत. राम जन्मभूमी मंदिर 1 फेब्रुवारी 1986 ला खुले करणे हा आणखी चुकीचा निर्णय होता, असे त्‍यांनी पुस्‍तकात लिहिले आहे.

बाबरी मशिद पाडणे हे पूर्णत: विश्वासघातकी कृत्य होते. एका धार्मिक प्रतिकाचा विध्वंस चुकीचा आणि राजकीय हेतूने प्रेरित होता. यामुळे भारत आणि परदेशातील मुस्लिमांच्या भावनांना धक्का पोहोचला. सहिष्णू आणि विविधतेत एकता अशी असलेली भारताची प्रतिमा या घटनेने नष्ट झाली, असेही मुखर्जी यांनी लिहिले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि सीमेपार दहशवाद सुरु झाला. राज जन्मभूमी मंदिर, बाबरी मशिदीच्या मुद्द्यांनी देश हादरला. शेवटी 21 मे 1991 रोजी एका आत्मघातकी हल्लेखोरांनी राजीव यांच्या जीवनाचा अंत केला, असेही राष्ट्रपतींनी लिहिले आहे.