आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती पदाचे उमेदवार करण्यासाठी शोधावे लागले होते डॉ. कलामांना, बंद केल्या अनेक प्रथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी - Divya Marathi
डॉ. कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी
नवी दिल्ली - देशाचा राष्ट्रपती होण्यासाठी लोक सर्वशक्ती पणाला लावतात. राजकीय पक्षांचे आकड्यांचे गणित चालते ते वेगळे. मात्र जेव्हा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याची चर्चा सुरू होती तेव्हा त्यांना त्याचा पत्ता देखील नव्हता. दिल्लीत सर्व घडामोडी घडत असताना कलाम तेव्हा चेन्नई विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये एका छोट्या रुममध्ये राहात होते. एनडीए सरकारने त्यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार करण्याचे निश्चित केले आणि याची माहिती त्यांना देण्यासाठी ते कुठे आहेत याचा शोध घ्यावा लागला. ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या अनेक परंपरा बंद केल्या. त्यामुळेच कदाचित त्यांना पीपल्स प्रेसिडेंट (जनतेचा राष्ट्रपती) ही उपाधी मिळाली.
'ए जर्नी थ्रू चॅलेंजेस'मध्ये डॉ. कलामांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती होण्याचा किस्सा सांगितला आहे. ते लिहितात, की 10 जून 2002 ची सकाळ अन्ना विद्यापीठाच्या सुंदर आणि शितल वातावरणात नेहमी प्रमाणेच आली होती. मी येथे 2001 पासून काम सुरु केले होते. विद्यापीठातील विस्तीर्ण आणि शांत परिसरात येथील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसह मी माझे काम छान करत होतो.

माझ्या वर्गात 60 विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था होती, मात्र तिथे 350 पेक्षा जास्त विद्यार्थी बसत होते. त्यांना बंदी घालण्याचीही सोय नव्हती. माझे काम तरुण विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेणे आणि मी राष्ट्रीय पातळीवर केलेले काम आणि अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे होते. मला दहा तासिकांमध्ये समाज परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे त्यांना समजावून सांगायचे होते.
पुढील स्लाइडमध्ये, कलाम राष्ट्रपती होण्याची पूर्ण कथा