आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींच्या डिनरमध्ये काश्मिरी ‘रिस्ता’, ‘लौकी नझाकत’ !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या सन्मानार्थ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी रात्री भोजनाचे आयोजन केले होते. त्यात काश्मिरी लज्जतदार ‘रिस्ता ’आणि ‘लौकी नझाकत’चा नवनिर्वाचित मंत्र्यांनी मनमुराद आस्वाद घेतला.
राष्ट्रपतींच्या डिनरमध्ये सर्वांना शाकाहारी पदार्थांना चांगलेच आकर्षित केल्याचे पाहायला मिळाले. ‘तंदुरी आलू ’, ‘साब्झ शामी कबाब’, ‘पनीर रेहाना’, ‘लौकी नझाकत ’ या पदार्थांची लज्जत मंत्र्यांनी चाखली. त्यासोबतच ‘पंजाबी कडी पकोडा’, ‘बेदामी आलू ’, ‘भारवा टिंडा ’, ‘सीताफल की सब्जी ’, ‘केओती दाल’ या पदार्थांचीही रेलचेल होती. नॉनव्हेजमध्ये ‘रिस्ता’, ‘गालोटी कबाब’, ‘पात्रानी माच्छी (पारसी डिश) ’, ‘मूर्ग कोर्मा ’ इत्यादी पदार्थांचा डिनरमध्ये समावेश होता. कॉर्न सूप, अननसाचा हलवा, जलेबी, रबडी या पदार्थांनी रात्र भोजनाचा शेवटही तेवढाच गोड करून टाकला होता.